#निवृत्तीच्या उंबरड्यावर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार!
संदेश क्रांती न्यूज. :
खानापूर (सुहास पाटील)
बरगांव (ता.खानापूर ) येथील प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक एस एल भक्तुरी यांना यंदाचा सन २०२५-२६ सालचा देण्यात येणारा बेळगांव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन पालक मंत्री सतीश जारकिहोळी ,आमदार,तसेच शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ आदीच्या उपस्थित मानचिन्ह,शाल,प्रमाणपत्र व हार घालुन सत्कार करण्यात आला.
यानिमित्त त्याच्या थोडक्यात परिचय!
एस एल भक्तुरी यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात तोपिनकट्टी येथे दि. ३ जुन १९६६ रोजी झाला.त्याचे प्राथमिक शिक्षण मूळगांवी झाले. त्यानंतरचे हायस्कूलचे पर्यंतचे शिक्षण जोतिराव फुले विद्यालय गर्लगुंजी येथे झाले.
टी सी एच कोर्स झाल्यानंतर. आँगष्ट .१९९४ मध्ये सरकारी मराठी लोअर प्राथमिक शाळा पाटये (ता. खानापूर) दुर्गम जंंगल भागात शिक्षक म्हणून नेमणूक झाली. या शाळेत सन् १९९४ ते २००६ पर्यंत १२ वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्यांची बदली सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा जटगे (ता. खानापूर) दुर्गम भाग येथे एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर त्याची बदली हारूरी शाळेत. सन् २००७ ते २०१४ पर्यंत सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा हारूरी याठिकाणी ७ वर्षे प्रामाणिकपणे नोकरी केली. या शाळेत प्रभारी मुख्याध्यापक असताना ” शाळा आदर्श पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर २०१४ ते २०१८ पर्यंत ४ वर्षे ” समुह संपन्नमुल व्यक्ती” केंद्र प्रमुख इदलहोंड म्हणून रूजू झाले. सर्व केंद्रातील शालेय प्रगतीबाबत व विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत देखभाल घेतली. सर्व सरकारी योजनांची माहिती सर्व शाळा मुख्याध्यापकांना देण्याचे कार्य केले. त्यानंतर पुन्हा बदली प्रक्रियेत सन् २०१८ते २०२० मध्ये सरकारी मराठी पूर्व प्राथमिक मराठी शाळा सिंगिनकोप ( ता. खानापूर) याठिकाणी २ वर्षे सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झालो. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करणे. पोपट पक्ष्यांना मटकी बांधून खाऊ घालणे. अशाचवेळी ” शाळेला पर्यावरण पक्षी मित्र पुरस्कार” देवून सन्मान करण्यात आला. त्यानंतर पुन्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली. सन् २०२० ते २०२४ मध्ये बढती मुख्याध्यापक म्हणून सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा काटगाळी ता. खानापूर जि. बेळगांव येथे हजर झाले. या कालावधीमध्ये ग्राम पंचायत नागुर्डा येथून शालेय खोलीचे काम पूर्ण करून घेतले. त्याचप्रमाणे हायटेक शौचालय व मुतारी मुलामुलींना बांधून घेण्यात आले. शाळेच्या कौलारूच्या वरती पत्रे तालुका पंचायत खानापूर मधून घालण्यात आले. त्यानंतर ४ वर्षाच्या कालावधीत पुन्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्या बदली प्रक्रियेत पुन्हा सन् २०२० मध्ये सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा बरगांव( ता. खानापूर) या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून नोकरी बजावत आहे.
आतापर्यंत 31 वर्षे 3 महिने शिक्षकाची नोकरी बजावलेली आहे. येत्या 9 महिण्यानंतर ३२ वर्षाच्या कालावधीनंतर निवृत्ती शिक्षकी सेवेतुन निवृत्त होत आहे.
निवृत्तीच्या उंबरड्यावर असताना त्याना बेळगाव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल खानापूर तालुक्यातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.