#बॅकेचे चेअरमन अमृत शेलार यांची माहिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील दि खानापूर को-आँप.बॅकेची १०३ वी.वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवारी दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता खानापूरातील केदार मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.अशी माहिती बॅकेचे चेअरमन अमृत शेलार यानी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सन २०२४-२५ सालात ७५३ कोटीची उलाढाल झाली आहे. तर बॅकेला १३ लाख ६३ हजार रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बॅकेचे १४४०४ इतके अ वर्ग सभासद असुन अहवाल वर्षी ७० नीन सभासद झाले असुन १०० सभासद कमी झाले आहेत.बॅकेचे ब वर्ग सभासद १६१२ इतके आहेत. अहवाल वर्षी २७० नवीन सभासद केले आहेत. तर
३६ सभासद कमी झाले आहेत.
बॅकेकडे भागभांडवल ३ कोटी ३७ लाख,४७ हजार ५५० रूपये तर राखीव व इतर निधी ११ कोटी ८३ लाख २ हजार ६९ रूपये इतकी आहे.
तर बॅकेकडे ८५ कोटी ९५ लाख ९७ हजार ३८२ रूपये इतकी ठेवी आहेत.बॅकेने सभासदाना ६२ कोटी ९६ लाख १० हजार ४५२ रूपये इतक्या कर्जाचे वितरण केले आहे. वर्ष आखेरीस ६८६ थकबाकीदार सभासदाकडून ३ कोटी ८५ लाख ३ हजार ६६ रूपये बाकी येणे आहे. खेळते भाग भांडवल १०७ कोटी ८८ लाख ३० हजार ८३४ रूपये आहे.
दि.३१ मार्च २०२५ रोजी २९ कोटी ५९ लाख ६३ हजार ५६५ रूपयांची गुंतवणुक केली आहे. ५ लाख रूपये पर्यतच्या ठेवीना विमा संरक्षणाची व्यवस्था केली आहे.
बॅकेच्या खानापूर ,नंदगड,टिळकवाडी -बेळगाव, बिडी ,पारिश्वाड ,काकतीवेस बेळगाव येथे शाखा कार्यरत आहेत.
लेखा परीक्षणात बॅकेला अ वर्ग मिळाला आहे.चालु वर्षात व्यवस्थापन मंडळाच्या २३ सभा झाल्या आहेत.
तरी शनिवारी दि.१३रोजीच्या सर्वसाधारण सभेला मोठ्या संख्येने सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन ,व्हा.चेअरन व संचालक मंडळानी केले आहे.