#शिक्षक दिनी सत्कार!
#गवाळी मराठी शाळेत तब्बल २१ वर्षे सेवा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम व मागासलेल्या जंगल भागातील गवाळी गावच्या पूर्व प्राथमिक मराठी शाळेत एस आर जाधव यांची दि.२३-मार्च २००४ रोजी नेमणूक झाली. गेली २१ वर्षे सेवा बजावत आहेत.
खानापूर तालुक्यातील गवाळी सारख्या गावात अधिकारी एक दिवस जाण्यास तयार होत नाही.त्या गवाळी गावच्या शाळेत २१ वर्षे सेवा बजावत केवळ इयत्ता ५ वी पर्यत वर्ग व एकच खोली असलेल्या शाळेत पहिली ते सातवी पर्यतचे वर्ग सुरू करून चार वर्ग खोल्या तयार केल्या. गवाळी
शामराव राजाराम जाधव
सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा गवाळी शाळेच्या इतिहासात प्रथमच बालवैज्ञानिक स्पर्धा (इनस्पायर ॲवॉर्ड मध्ये) राज्य पातळीवर स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले. तसेच जिल्हास्तरावर शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला. व्हॉलीबॉल स्पर्धेत झोनल लेवल मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. शाळेचे अनेक विद्यार्थी आक्रिटेक्चर म्हणुन, निमसरकारी पदावर कार्यरत असुन २००७ नंतर मुलीसाठी दहावीपर्यंत शिक्षण मिळावे यासाठी दरवर्षी पाठपुरावा करत आहे .
आदर्श शिक्षक म्हणून कर्नाटक राज्य अल्पसंख्याक शाळा संघा,चिकोडीद्वारे सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर
लायन्स क्लब बेळगाव द्वारे सन्मानित
जामगांव येथे आयोजित मराठा सिनीयर काॅलेज , खानापूर यांच्या भीमगड निसर्ग साहित्य संमेलन यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले होते.तसेच विश्व भारती कला क्रीडा संघटना बेळगाव यांचा पुरस्कार देण्यात होता. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान , खानापूर यांच्यावतीने प्रयोगशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
याची दखल घेऊन यंदाचा तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते शनिवारी दि ६ सप्टेंबर रोजी देण्यात आला.
या पुरस्काराबद्दल त्यांचे खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.