#शोध कार्य सुरू!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
अनंत चतुर्थीनिमित्त गणेश विसर्जन यडोगा ( ता.खानापूर ) येथील मलप्रभा नदीच्या काठावर केले जाते. शनिवारी दि.६ रोजी दुपारी यडोगा गावचा युवक संजय उर्फ शुभम यल्लापा कुपटेकर ( वय.२१ )हा आपल्या घरगुती गणश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी चापगाव यडोगा रस्त्यावरील मलप्रभा नदीच्या पुलाजवळ गेला होता. विसर्जनावेळी त्याला पोहता येत होते म्हणुन गणेश विसर्जनासाठी तो नदी पात्रात उतरला .परंतू गणेश विसर्जन करून तो पोहत होता.त्यावेळी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहुन गेला.व बंधारा पार करून दुसर्या बाजूला जात असताना काहीच्या दृष्टीस पडला. मात्र तो पोहत असावा असा अंदाज केल्याने तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर बरेच अंतर गेल्याने तो पाण्याबाहेर आलाच नाही.त्यामुळे नदी बुडाल्या भिती निर्माण झाली आहे अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली.
लागलीच घटनेची माहिती नंदगड पोलिसाना मिळताच नंदगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले .व युवकाचा शोध कार्य सुरू करण्यात आला.
या घडनेमुळे यडोगा गावावर शोक कळा पसरली असुन नागरीकांतुन हळहळ व्यक्त होत आहे.