संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
वर्षातुन एकदा येणारा शिक्षकांचा आनंदाचा दिवस म्हणजे शिक्षक दिन होय. यंदा खानापुर तालुक्यात शिक्षक दिन शनिवारी दि.६ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.
याच दिवशी खानापूर तहसील कार्यालयात बीएलओ म्हणून कामे करणार्या शिक्षकाना शनिवारी सकाळी हजरा राहण्याचा आदेश काढल्याने शिक्षकांच्या आनंदावर विरजन टाकले.
खरे म्हणजे शिक्षक दिन हा शिक्षकांचा आनंदाचा दिवस या दिवशी आदर्श शिक्षकाचा सत्कार केला जातो.त्यांचा मानसन्मान केला जातो.
परंतु तहसील कार्यालयातुन शिक्षक दिन कार्यक्रमा दिवशीच बीएलओ म्हणून काम करणार्या शिक्षकाना तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिल्याने बीएलओ शिक्षकातुन नाराजी पसरली.
त्यामुळे तहसील कार्यालयातील काम आटोपून लगबगीने शिक्षक दिन कार्यक्रमाला जाताना शिक्षकांची दमछाक उठाली.
सरकारच्या या कामामुळे शिक्षकाना माणसीक तान पडत आहे.त्यातुन अनेक शिक्षकाना हृदय विकार, रक्तदाब,साखर रोग अशा प्रकारचे रोग लागत आहेत.अशातुन अनेक शिक्षकांच मृत्यू ही झाले आहेत.
#बीएलओ काम शिक्षका व्यतिरीक्त इतर खात्याकडे सुपूर्त करावे!
शिक्षकाला सरकारच्या प्रत्येक कामासाठी दावणी जु़पतात. त्यामुळे शैक्षणिक दर्जा खालवला आहे.यासाठी बीएलओ म्हणून शिक्षकाना न देता इतर कोणत्याही खात्याच्या कर्मचाराना देण्यात यावे.अशी मागणी केली जात.
परंतु इतर खात्यात शिक्षका सारखा प्रामाणिक कर्मचारी इतर कोणत्याही खात्यात सापडत नाही.त्यामुळे सरकारच्या प्रत्येक कामात शिक्षकाला जुंपले जाते. त्यातच चांगले विद्यार्थी घडविण्याची आपेक्षा पालक वर्गाकडुन होते.
त्यामुळे शिक्षक चारी बाजुने भरडला जात आहे.
तर शिक्षकाकडुन देशाची चांगली पिढी निर्माण करण्याची मागणी नागरीकातुन होते.