संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा ( ता.खानापूर ) येथील श्रीदेव रवळनाथ मंदिरात फरशी बसवण्याचा कार्यक्रम गावचे सुपुत्र अविनाश नारायण पाटील उद्योजक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार विजय प्रकाश पाटील निवृत्त लष्करी हवालदार होते. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत नामदेव गुंडु गुरव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या समयी श्री रवळनाथ पूजन श्री रतन प्रकाश गुरव, गणेश पूजन माणिकराव देसाई, हनुमान पूजन गोपाळ पाटील, विठ्ठल-रुक्मिनी पूजन अजित पाटील, कलावती आई पूजन ॲडव्होकेट कु. प्रगती मारुती देसाई, कासव पूजन श्री बालाजी देवकरी, तुळशी पूजन विलास सुतार सरपंच तुडये यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली, या समयी ॲड. प्रगती देसाई, कु. मनाली पाटील डिझाईन इंजिनिअर मर्सिडीज बेंझ, सुर्याजी देवकरी निवृत्त पीडीओ, विजय पाटील निवृत्त हवालदार भारतीय सेना, यल्लाप्पा मांगेलकर निवृत्त सुभेदार भारतीय सेना, शिवराम पाटील निवृत्त हेस्कॉम कर्मचारी यांचा सत्कार श्रीदेव रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक व स्वागत जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब नारायणराव दळवी यांनी केले, कार्याध्यक्ष बाळासाहेब शेलार, सेक्रेटरी प्रकाश गुरव, खजिनदार शांताराम पाटील, सदस्य प्रकाश पाटील,मर्याप्पा देवकरी, विजय भटवाडकर, बळवंत देसाई, मल्लाप्पा देवलतकर, नारायण गुंडपीकर, कृष्णाजी देवलतकर, उद्योजक दिपकराव पाटील, कॉंग्रेस कार्यकर्ते ईश्वर बोबाटे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले, मंदिर जीर्णोद्धारासाठी अविनाश पाटील यांनी कै. नारायण सुराप्पा पाटील व कै. लक्ष्मी नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपये जाहीर केले आहे. यावेळी खालील देणगीदार कु. मनाली व स्वराली दिपकराव पाटील २१००० रुपये, रतन प्रकाश गुरव १५५५५ रुपये, यल्लाप्पा गुंडु मांगेलकर १५०५१ रुपये, संजय दत्तू गुरव ११५०५ रुपये, प्रसादसिंह आबासाहेब दळवी १११११ रुपये, ईश्वर रामचंद्र भटवाडकर ११००० रुपये, विलास सुतार सरपंच तुडये १०००१ रुपये, गंगाराम पुंडलिक देवकरी ८८८८ रुपये, मारुती माणिकराव देसाई ७७७७ रुपये, विश्वनाथ मारुती देवकरी ५५५५ रुपये, कु. रोहन व कु. रोहिणी रविंद्र गुंडपीकर ५५५५ रुपये, विजय प्रकाश पाटील ५१५१ रुपये, श्रीकांत पांडुरंग बोबाटे ५००१ रुपये, मारुती कृष्णा देवकरी ५०५५ रुपये, विनायक नारायण पाटील ५००१ रुपये, श्रीपाद नारायण पाटील ५००१ रुपये, गंगाराम नारायण देवलतकर ५००१ रुपये, आदीनी देणगी देऊ केली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ईश्वर मंगेश बोबाटे यांनी केले.
