संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
पारिश्वाड ( ता.खानापूर ) येथील आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य विभाग व पारिश्वाड प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने नुकताच पार पडलेल्या रक्तदान आरोग्य शिबारात जवळपास ५७ जणांनी स्वेच्छा रक्तदान केले.
यावेळी खानापूर तालुका आरोग्य वैद्यकिय आधिकारी डाॅ.महेश किडवसन्नावर यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे उदघाटन केले.
कार्यक्रमाला पारिश्वाड ग्राम पंचायतीचे विकस अधिकारी अभिजीत के.एम. , लोकोळी ग्राम पंचायतीचे विकास अधिकारी विनोद मुतगी,ग्राम पंचायत सदस्य मोहसीन मारीहाळ , शंकर चौगवण्णावर, कृष्णापा मनोगी,तसेच आयुष्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.एम एम मेरद,व इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.