{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#४० ते ५० हजार रूपयापर्यत बकर्याच्या किमती.
#विविध भागातुन बकरी दाखल!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे गणेशोत्सवा नंतर दुसर्या दिवशी येणार्या ऋषी पंचमी (उंदरीच्या सनासाठी) रविवारी दि.२४ रोजी खानापूर शहरातील हलकर्णी फाट्यावरील मर्याम्मा मंदिर समोर भरलेल्या बकरी बाजारात कोटी रूपयांची उलाढाल झाली.
या बकरी बाजारात बेळगाव जिल्हासह ,धारवाड, गोकाक, रायबाग, बैलहोंगल तसेच खानापूर तालुक्यातील कान्सुली, मोदेकोप, काटगाळी,गवळी वाड्यासह विविध गावातील हजारो बकरी आली होती.
बकरी बाजारात बकर्याचा दर तीन हजार रूपया पासुन ते ४० ते ५० हजार रूपया पर्यत होता. ऋषी पंचमी ( उंदरीच्या ) सनाला प्रत्येक कुटूंबाकडुन बकर्याचा मान दिला जातो.त्यामुळे खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरीक बकरी खरेदी मोठ्या संख्येने खानापूरच्या बकरी बाजारात दाखल झाले होते.
या बकरी बाजारात बेळगाव जिल्हातील तसेच गोकाक,रायबाग,बैलहोंगल खानापूर तालुक्यातील अनेक दलाल,तसेच अनेक भागातील मेंढपाळ बकरी घेऊण विक्रिसाठी आले होते.
रविवारी सकाळी सात वाजल्यापासुन खानापूरच्या हलकर्णी फाट्यावर बकरी खरेदीसाठी नागरीकानी गर्दी केली होती.
त्यामुळे पणजी बेळगांव महामार्गावरील
हलकर्णी फाट्यावर बराच वेळ वाहतुक ठप्प झाली.यावेळी पोलिसानी वाहतुक नियंत्रणासाठी हजेरी लावली होती.
रविवारच्या बकरी बाजारात कोटी रूपयाची उलढाल झाल्याचे सांगण्यात आले.
ऋषी पंचमी ( उंदरी) चा सन हा खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावागावात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.तसेच बेळगांव तालुक्यात ही प्रथा आहे.
श्रावण महिण्यात एक महिणा मांसाहारी जेवण वर्ज केले होते.आता गुरूवारी दि. २८ रोजी ऋषी पंचमी (उंदरीच्या) सना दिवशी मांसाहारी जेवणाला सुरूवात होणार आहे.
त्यासाठी ऋषी पंचमीच्या सनासाठी बकरी बाजरात एकच गर्दी दिसुन आली त्याचबरोबर कोट्यावधी रूपयांची उलाढाल देखील झाली.