संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता.खानापूर) वारकरी पारायण मंडळ आणि गावच्या हरि भक्तांच्या पंढरपूर भक्तीसनिवासी नुतन इमारतीचा चौकट पुजन कार्यक्रम आज मंगळवारी दि.५ रोजी पंढरपूर येथे संपन्न झाला.
प्रारंभी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील यानी पुजन कार्यक्रमाची सुरूवात केली.
त्यानंतर या भक्ती निवास चौकट समारंभ कार्यक्रमाच्यावेळी चौकट पुजन सौ.व श्री बाबुराव यल्लाप्पा मेलगे (अध्यक्ष माजी सैनिक संघटना गर्लगुंजी) वत्यांच्या पत्नी सौ सातुली बाबूराव मेलगे यां दांपत्याच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत , गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य सुरेश मेलगे, भरत गोरे, हभप कल्लापा मेलगे, पुंढलिक चौगुले, मर्याप्पा पाखरे,माजी सैनिक परशराम पाटील, प्रभाकर पाखरे, राजाराम हंप्पणावर, हभप सुतार,तसेच गर्लगुंजीचे संत मंडळी,वारकरी, प्रमुख नेते,विविध संघ संस्थाचे चेअरमन संचालक तसेच गावचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील याच्याहस्ते गर्लगु़जी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव मेलगे यांचाशाल व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला .तर सौ सातुली बाबूराव मेलगे यांचा सत्कार सौ तुळसा सावंत यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत बोलताना म्हणाले की , पंढरपूर या महान पवित्र धर्मस्थळी गर्लगुंजी गावच्या भक्ति निवासाची उभारणी झाली. हे गर्लगुंजी ग्रामस्थाचे मोठे भाग्य आहे.
गर्लगुंजी गावचे वारकरी पारायण मंडळचे हभप,गावचे वारकरी ,विठ्ठलाचे भक्त,गावचे नागरीक नेहमी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला येतात. त्याना पंढरपूरच्या ठिकाणी आपल्या भक्ति निवासामध्ये राहण्याची सोय होणार हे सर्वाचे भाग्य आहे.
त्यामुळे विठ्ठल भक्तीचा ओढा वाढणार .असे मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमला वारकरी ,माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी ,गावचे नागरीक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.