#दुसर्या श्रावण सोमवारी गोव्याच्या मंगेशीचे दर्शन !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हिंदु धर्मात श्रावण मासाला अधिक महत्व आहे.श्रावण महिण्यातील प्रत्येक सोमवारी विविध मंदिरात अभिषेक ,महापुजाप्रसादाचे आयोजन केले जाते.
यानिमित्त खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी श्रावण महिण्यातील दुसर्या सोमवारी दि.४ आँगष्ट रोजी गोवा राज्यातील प्रसिध्द देवस्थान मंगेशी आणि मार्दोळ मंदिरात उपस्थिती दर्शवुन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी खानापूर तालुक्यातील बळीराजाला सुख समृध्दी मिळू दे.पिक पाणी भरभरून मिळू दे.अशी मागणी मंगेशी मंदिरातील देवीकडे तसेच मार्दोळ मधील देवीकडे केली.
त्यांच्या सबोत खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, समाज सेवक नारायण काटगाळकर, सिध्दापा देसाई (इनामदार) आदी उपस्थित होते.
येत्या तिसर्या सोमवारी कोल्हापूरच्या जोतिबाचे दर्शन तर चौथ्या सोमवारी सोगल सोमनाथ मंदिराला जाऊन दर्शन घेणार असल्याचे त्यानी बोलताना सांगीतले.