#पालक मेळाव्यात केली निवड!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील चिरमुरकर गल्ली सरकारी मराठी मुलांची शाळेत नुकताच झालेल्या पालक मेळाव्यामध्ये २०२५ ते २०२८ या तीन वर्षाकरिता शाळा सुधारणा समितीची रचना करण्यात आली.
यावेळी मेळाव्याला माजी एसडीएमसी अध्यक्ष धाकलू गुरव उपाध्यक्ष सौ मंगल गुरव तसेच इतर सर्व सदस्य व सदस्या उपस्थित होते.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक मेळाव्यात नवीन एसडीएमसी अध्यक्ष म्हणून दत्ताराम गोपाळ गुरव तर एसडीएमसी उपाध्यक्षा म्हणून सौ दीपिका नागेश मोटर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन कमिटी मध्ये दत्ताराम गोपाळ गुरव अध्यक्ष सौ दीपिका नागेश मोटर उपाध्यक्ष राजश्री विठुराज गुरव सुनिता सुनील पेडणेकर सुजाता राजेश सूर्यवंशी रंजना मादार मयुरी मोहन मोरे पुनम गोकुळ धाकूरकर मानवी महादेव जाधव रेणुका कलाप्पा काकतकर यल्लाप्पा पिराजी कदम भरमाणी शाहू कदम हनुमंत बाळू सुतार अमीर इमाम हुसेन आणिगिरी शिवराज बाबुराव कदम अनिल बाबुराव पाटील संतोष मारुती कवळेकर तसेच शटवाजी रवळू गुरव या १८ जणांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता सायनेकर तसेच शिक्षक विलास सावंत हनमंत करंबाळकर टी बी मोरे, जे पी पाटील व जे बी होसुर उपस्थित होते.