संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता.खानापूर) गावच्या हरि भक्तांच्या पंढरपूर भक्तीसनिवासी नुतन इमारतीचा चौकट पुजन उद्या मंगळवारी दि.५ रोजी सकाळी पंढरपूर येथे होणार आहे.
या भक्ती निवास चौकट समारंभ कार्यक्रमाच्यावेळी चौकट पुजन सौ.व श्री बाबुराव यल्लाप्पा मेलगे (अध्यक्ष माजी सैनिक संघटना गर्लगुंजी) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
तेव्हा या कार्यक्रमाला गर्लगुंजीचे संत मंडळी,वारकरी, प्रमुख नेते,विविध संघ संस्थाचे चेअरमन संचालक तसेच गावचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.