संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी बेळगाव बससेवा नियमित सकाळी ७ .३० वाजता सुरू करावी. अशा मागणीचे निवेदन गर्लगुंजीच्यावतीने बेळगाव बस डेपो अधिकार्याना शुक्रवारी दि. १ आँगष्ट रोजी देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की पूर्वी, नियमित असलेली गर्लगुंजी बेळगाव ही बस सकाळी ७.३० वाजताची तोपिनकट्टी गावला जाते. त्यामुळे एक तासाचा वेळ वाया जातो .त्यासाठी गर्लगुंजीहुन ७.३० वाजता बस सुरू करावी . जेणे करून शाळा आणि काॅलेजच्या विद्यार्थ्याना तसेच कामगाराना जाण्यासाठी उपयोग होईल. अन्यथा गावापासुन पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या राजहंसगड क्राॅस चालत जाऊन थांबण्याची वेळ येणार आहे.
तेव्हा बस ७.३० वाजता सुरू करावी .अशी मागणी निवेनात केली आहे.
निवेदन देताना गर्लगु़ंजी ग्राम पंचायतीचे माजी चेअरमन गोपाळ पाटील ,माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, ग्राम पंचायत अध्यक्षा ललिता कोलकार, उपाध्यक्षा रेखा कुंभार, सदस्य अजित पाटील,प्रसाद पाटील,सुरेश मेलगे,सदस्या अनुराधा निट्टूरकर, अन्नपूर्णा बरूड आदी उपस्थित होत्या.
यावेळ बेळगाव बसडेपो अधिकार्यानी निवेदनाचा स्विकार करून बसवेळेत बदल करून देतो असे आश्वासन दिले .