#बैलाचा तलावाच्या पाण्यात गुदमरून मृत्यू!
संदेश कांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेकवाड (ता. खानापूर) येथील शेतकरी गुंजू विठ्ठल पाटील यांची बैलजोडी तळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
याबाबत सर्विस्तर माहिती अशी की बेकवाड येथे बंकी रोडला असलेल्या तलावात रोजगार हमी योजनेतून तलाव खोदकाम करण्यात आले होते यामध्ये पावसाचे पाणी भरून तलाव किती खोल आहे. याचा अंदाज सापडत नाही आहे.
बुधवारी सायंकाळी गुंजू पाटील हे आपल्या शेतात भात रोप लावण्यासाठी गेले होते. यावेळी पूर्व मशागत करण्यासाठी बैल जोडी सहाय्याने मशागत काम करून घरी जातेवेळी तलावात घाण झालेली बैलजोडी धुऊन घेण्यासाठी तलावा काठी गेले असता या तलावात रोजगार हमी योजनेतून काढण्यात आलेला खड्डा याचा अंदाज आला नसल्याने या खड्ड्यात पडून दोन्ही बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला यात या शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी येऊन घटनेचा पंचनामा केला व बैलांचे मृतदेह उतरणीय तपासणी करून मालकाच्या ताब्यात देण्यात आले यानंतर रात्री उशिरा जेसीबीच्या सहाय्याने खड्डा काढून त्यांना दफन करण्यात आले.