७५ वर्षापासुन केली होती बससेवेची प्रतिक्षा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका म्हणजे अति जंगलाने व्यापलेला तालुका अशी खानापूर तालुक्याची ओळख आहे. त्यातच अति पावासाचा तालुका त्यामुळे गेल्या
मागील ७५ वर्षापासून किरावळे (ता.खानापूर ) गावामध्ये कोणतीही बससेवा चालू नव्हती त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची लोकांची गैरसोय होत होती .ही गैरसोय लक्षात घेता तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी आज किरावळे गावातील विद्यार्थीसाठी, लोकांसाठी सोमवारी दि. १४ पासून गावातून किरावळे खानापूर अशी बस सेवा सुरू करण्यात आली.
प्रारंभी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते फित कापून नुतन बससेवाचा शुभारंभ केला.
बससेवा शुभारंभ कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष सौ. स्वाती गुरव, उपाध्यक्ष अमोल बेळगांवकर, सामाजिक कार्यकर्ते पंकज कुट्रे, कृष्णा पाटील व गावातील नागरिक आणि महिला व शिक्षक , विद्यार्थी वर्ग उपस्थित होते