खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्याची दयनीय आवस्था झाली आहे.त्यामुळे नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच खानापूर असोगा रस्यावरील रेल्वेस्थानकाजवळ भुयारी मार्गासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे रस्ता कोसळत चालला आहे. त्यामुळे भविष्यात खानापूर असोगा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. याची दखल घेऊन रस्ता सुरळीत करावा.
खानापूर तालुका हा अतिजंगलाने व्यापलेला तालुका आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी भलेमोठे वृक्ष कोसळुन ८ ते १० दिवस वीजपुरवठा खंडीत होतो. तेव्हा हेस्काॅम खात्याने याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा.तसेच खानापूर सरकारी इस्पितळात मराठी फलक लावावा.आदी मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदाराना देण्यात आले आहे.
निवेदण्यात दिलेल्या समस्या लवकरात लवकर सोडवा.असे म्हटले आहे.
निवेदन देताना माजी आमदार दिगंबर पाटील,कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी,माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई,
गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, अजित पाटील, डी.एम. भोसले, भीमसेन करबळकर, संजीव पाटील, राजाराम देसाई, कृष्णा कुंभार, ब्रह्मानंद पाटील, वसंत नावलकर, सुधीर नावलकर, म्हात्रू धाबले, मर्याप्पा पाटील व आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपतहसीलदार राकेश बुवा यानी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.