#राज्य आपत्ती निवारण निधी!
“आमदार विठ्ठलराव हलगेकर या़ची पत्रकार परिषद”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील विविध भागातील ६ पुलांच्या बांधकामासाठी २ कोटी ४० लाख रूपये निधी मंजुर झाल्याची माहिती आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी दिली.
ते म्हणाले की ,राज्य आपत्ती निवारण निधी विशेष आनुदाना अंतर्गत राज्य सरकारने तालुक्यातील ६ पुलांना मंजुरी दिली.
आणि जिल्हाधिकार्यानी कामाच्या अंमल
बजानणीला मान्यता दिली. अशी माहिती आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी दिली .
यावेळी बोलताना ते म्हणाले की, तालुक्यातील लोंढ्याजवळी माचाळी -सातनाळी रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी ४८ लाख ७५ हजार रूपये. हलसाल -करंजाळ रस्त्यावरील पुल बांधण्यासाठी ७५ लाख ,लोंढा -वरकड रस्त्यावरील पुलासाठी ३७ लाख ५ हजार रूपये,नंजीलकोडल -वड्डेबैल रस्त्यावरील पुलासाठी ३३ लाख ७५ हजार रूपये. बिडी -हिंडलगी मार्गावरील पुलासाठी ३० लाख रूपये,जत -जांबोटी महामार्गावरील २१० .८० कि.मीटर अंतरावरील संरणक्ष भित बांधण्यासाठी १५ लाख रूपये.अनुदान मंजुर झाले आहे. लवकरच कामाला सुरूवात होणार आहे .अशी माहिती दिली.