#आवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नेहमीच गजबजलेल्या खानापूर जांबोटी या १८ किलो मीटर अंतराच्या रस्त्यावर अवजड वाहनाच्या वर्दळीमुळे खड्डयांचे प्रमाण वाढुन यामहामार्गाची दुर्दशा झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्याचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या अनेक वर्षापासुन खानापूर जांबोटी या जवळपास १८ किलो मीटर अंतराचा रस्ता दुरूस्त झाला नाही. त्यातच कुसमळीचा मलप्रभा नदीवरील ब्रिटीश कालीन पुल वाहतुकीला धोका दायक झाल्याने नवीन पुलाचे काम हाती घेतल्याने यामार्गावरील अवजड वाहतूक जांबोटी खानापूर मार्गावरून वळविल्याने आधिच खड्ड्याने भरलेल्या रस्त्यावर पुन्हा जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.त्यातच मुसळधार पावसाने सतत हजेरी लावुन रस्त्याची वाट लागली आहे.
# केंद्रीय राज्य महामार्ग विकास निधीतुन ६ कोटीचा निधी मंजुर!
तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी खानापूर जांबोटी महामार्गासाठी केंद्रीय राज्यमहामार्ग विकास निधी अंतर्गत सहा कोटी रूपयाचा निधी मंजुर केला आहे.
मात्र कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याच्या कामाचा बोजवारा उडला.आज या रस्त्याची दैयनिय आवस्था निर्माण झाली.
आता पावसाळा संपताच दुरूस्तीच्या कामाला लागावे लागणार.तोपर्यत वाहन धारकाना वाहने चालविताना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागणार. तेव्हा वाहने सावकास चालवा. अन्यथा आपघाताला सामोरे जा.असे म्हणावे लागेल.