#केवळ ३ तक्रारी ! मोबाईलव्दारे करतात तक्रारी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्यातील जनता ग्राहक मेळाव्याला उपस्थिती लावुन तक्रार मांडत नाहीत. केवळ मोबाईलव्दारे तक्रारी मांडुन आडचणी दुर करतात. त्यामुळे प्रत्येक महिण्याच्या तिसर्या शनिवारी घेण्यात येणार्या हेस्काॅमच्या ग्राहक मेळाव्याला हातावर मोजता येईल इतक्याच ग्राहकांची उपस्थिती असते. तेव्हा शनिवारी दि.२१ रोजी पार पडलेल्या ग्राहक मेळाव्यात मोरब,कौलापूर व गर्लगुंजी या तीन गावच्या तक्रारी ग्राहक मेळाव्यात मांडण्यात आल्या. तेव्हा ग्राहकानी ग्राहक मेळाव्याकडे दुर्लक्ष न करता ग्राहक मेळाव्यात उपस्थिती दर्शवुन तक्रारी मांडाव्यात .असे मत हेस्काॅमचे कार्यकारी अभियंते जगदिश मोहिते यानी ग्राहक मेळाव्यात मांडले.
प्रारंभी सहाय्यक अभियंते एस सी अंगडी यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
ग्राहक मेळाव्यात मोरब येथील प्राथमिक मराठी शाळेला नवीन मीटर बसवण्याची मागणी मुख्याध्यापिका सौ . पाटील यांनी केली. तर कौलापूर येथील प्राथमिक मराठी शाळेला फ्री बील मिळण्याची सोय करून द्यावी. अशी मागणी केली.
तसेच गर्लगुंजी परिसरात वारंवार वीजेचा लंपडांव होत आहे.यासाठी दुरूस्तीचे काम करून वीज पुरवठा सुरळीत करावा.अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यानी केली.
यावेळी हेस्काॅमचे कार्यकारी अभियंते जगदिश मोहिते यानी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी हेस्काॅमच्या ग्राहक मेळाव्याला अधिकारी अभियंते एस सी अंगडी, नमित इंजार,लक्ष्मी रंगनाथ ,श्री देशपांडेे आदी उपस्थित होते.
आभार लक्ष्मी रंगनाथ यानी मांडले.