
#लवकरच लोकायुक्त पोलीसांकडे तक्रार दाखल करणार ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी व महांतेश राऊत !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूरात एका ३०\४० च्या प्लॉट ला १५००० रूपये सब-रजिस्टर ऑफीस च्या नावाने घेतले जात असल्याची तक्रार खानापूर कॉंग्रेस कडे करण्यात आलीआहे.
तालुक्यातील गरीब लोकं, सामान्य जनता शेती किंवा प्लॉट का विकतात आपली काय तरी अडचण असते कधी लग्नकार्य, कधी औषध उपचार ,तर कधी बॅंक लोन भरायचे असते .अशा अडचणींच्या काळातच नागरीक बऱ्याच वेळा व्यवहार करत असतात. अशा अडचणीच्या माणसांकडून अशी मोठ्या रक्कमेची लुट करणे योग्य नसल्याचे दोन्ही अध्यक्षांचे मत बनले आहे.
लवकरच यासंदर्भात लोकायुक्त बेंगलोर येथे तक्रार ड्राफ्ट करून देण्यात येणार आहे.
गोर गरीब सामान्य जनतेची लूट आम्हास मान्य नसल्याचे ॲड घाडी व मानतेश राऊत यांनी सांगितले.
लवकरच या संदर्भात मोठे आंदोलन छेडणार असल्याचे दोघांनीही सांगितले.