
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील भांडुरा नाल्याचे पाणी धारवाड जिल्ह्यात मोठ्या पाईपव्दारे वळविण्यासाठी कर्नाटक सरकारने आखलेल्या योजनेमुळे खानापूर तालुक्यातील सुपीक जमिनी सरकारकडुन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे.या पार्श्वभूमीवर खानापूर वाचवा ,शेती वाचवा,पाऊस वाचवा. या घोषवाक्याखाली बुधवारी एक महत्वाची बैठक बुधवार दि.९रोजी आयोजीत करण्यात आली आहे.
यासाठी बुधवारी दि.९ रोजी सकाळी १०.३० वाजता खानापूर येथील वागळे काॅलेज येथे बैठक बोलविण्यात आली आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यातील स्थानिक शेतकरी ,पर्यावरणप्रेमी,तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहभाग दर्शवावा.
याबैठकीत पुढील दिशा कायदेशी पर्याय ,पर्यावरणीय परिणाम व स्थानिक जनतेच्या हक्का संदर्भात चर्चा होणार आहे.
या प्रकल्पामुळे केवळ शेतकर्याच्या जमिनाचे नुकसान होणार नसुन खानापूर तालुक्यात पाऊस कमी होण्याचा धोका संभवणार आहे. स्थानिक जंगलाचे नुकसान,हवामानात बदल,या सगळ्याचाच परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या मोहिमेसाठी दिलीप कामत,डाॅ.शिवाजी कागणीकर,सुजीत मुळगुंद, कॅप्टन नितीन धोंड, अँड.नागाप्पा लातुर व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.तरी बैठकीला सर्व नागरीकानी उपस्थित राहावे.असे आवाहन करण्यात आले आहे.