
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मच्छे (ता.बेळगावी ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या सहशिक्षिका सौ. नीला बी.बाळेकुंद्री याना आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधुन बेळगाव तालुका प्राथमिक शाळा शिक्षक सोसायटीच्या गुरूस्पंदनच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने रविवारी दि.६ रोजी बेळगाव येथील गांधी भवन सभागृहात सन्मानित करण्यात आले.
सहशिक्षिका सौ नीला बी.बाळेकुंद्री यामुळच्या गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावच्या असुन त्यानी शिक्षकी सेवेची सुरूवात इदलहोंड ( ता.खानापूर ) येथील माॅडेल मराठी मुलांच्या शाळेतुन केली. त्यानंतर त्यांची बदली निट्टूर ( ता.खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत झाली. तेथून त्याची बदली बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी मराठी शाळेत झाली.त्यानंतर त्याची बदली मच्छे ( लक्ष्मीनगर) येथील एम एच पी एस शाळेत झाली.
मच्छे (लक्ष्मीनगर ) उच्च प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच विकासासाठी व मौल्यवान शिक्षण देण्यासाठी सतत सक्रिय सहभाग घेऊण सेवा बजावली. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन सौ नीला बी.बाळेकुंद्री याना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर शिक्षण क्षेत्रातील ,राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.