
#यात्रेनिमित्त तलावावर कपडे धुण्यासाठी तलावावर गेला होता!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
देमीनकोप ( ता. खानापूर ) गावाजवळ असलेल्या तलावात रविवारी ( दि.६ ) रोजी युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,देमिनकोप, कोडचवाड ( ता.खानापूर ) येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर यात्रा सोमवारी ( दि.७ ) पासुन प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त तरूण चलवादी ( वय.२१ ) रा.कंचनोळी ( ता.हल्याळ ) हा आपल्या मावशीच्या घरी आला होता.
यात्रेनिमित्त घराची स्वच्छता करून रविवारी दुपारी देमीनकोप गावाजवळ असलेल्या तलावाकडे कुटू़बासोबत तरूण चलवादी सुध्दा तलावाकडे गेला होता.
यावेळी तरूण पोहायला तलावात उतरला मात्र तो पोहण्यात तरबेज नव्हता.त्यामुळे तो कुटूंबातील लोकासमोरच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
यावेळी कुटूंबातील लोकानी डोळ्यासमोरच तरूणचा बुडून मृत्यू झाल्याने एकच अक्रोश केला.
यावेळी लोकानी तलावाच्या दिशेन धाव घेतली.व त्याची शोधाशोध केली. मात्र तो सापडला नाही.लागलीच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. व नंदगड पोलिसाना घडनेची माहिती देण्यात आली.
यावेळी अग्नीशामक दलाच्या जवानानी मृत्यू देह तलावातुन बाहेर काढला. पोलिसानी घटनेचा पंचनामा केला.