
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील)
सरकारी आदेशाप्रमाणे रामगुरवाडी सी.आर.सी.केंद्राच्या वतीने सरकारी लोअर प्राथमिक मराठी शाळा मुडेवाडी व सरकारी लोअर प्राथमिक मराठी शाळा डुक्करवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने सन 2024 25 या शैक्षणिक वर्षातील प्रतिभा कारंजी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह भ प श्री लुमाण्णा बडकू अल्लोळकर माजी एस डी एम सी अध्यक्ष होते. दीप प्रज्वलन हलकर्णी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा जिजाबाई तुकाराम अल्लोळकर, पी.डि.ओ. रेष्मा पाणिवाले, उपाध्यक्षा सौ उज्वला भैरु कुंभार तसेच मुडेवाडी शाळेचे एस डी एम.सी अध्यक्ष श्री परशराम पुंडलिक चौगुले व डुक्करवाडी शाळेचे एस डी एम सी अध्यक्ष श्री भरत मारुती कुंभार तसेच एसडीएमसी उपाध्यक्ष,सदस्य, सदस्या आणि गावातील पंच कमिटी क्लस्टर मधील सर्व मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व विद्यार्थी हजर होते.प्रास्ताविक सीआरपी सौ रुपाली पवार यांनी केले.श्री.भैरु कुंभार खानापूर तालुका कुंभार समाज अध्यक्ष व पि डि ओ मॅडम, कार्यक्रममाचे अध्यक्ष यांनी प्रतिभा कारंजी विषयी विचार व्यक्त केले.विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र,मेडल,व वही देऊन गौरविले. मुडेवाडी व डुक्करवाडी ( फुलेवाडी ) ग्रामस्थांनी देणगी स्वरुपात मोठे सहकार्य केले. सूत्रसंचालन श्रीयुत एम. व्ही. चोर्लेकर सर मुख्याध्यापक एम.एल.पी.एस मुडेवाडी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मारुती कुगजी सर मुख्याध्यापक एम.एल.पी.एस डुक्करवाडी यांनी केले.