सुवासिनीनी आरती ओवाळुन केले स्वागत
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
गणपती बापा मोरया! आला रे आला गणपती आला. म्हणत गर्लगुंजी (ता. खानापूर ) परिसरात सालाबाद प्रमाणे यंदा ही घरगुती गणेश मुर्तीचे स्वागत शनिवारी दि .७ रोजी सकाळी ८ वाजल्यापासुन करण्यात आले.
गणेश सनानिमित्त गर्लगुंजी गावात घरोघरी सजावट करण्यात आली होती. विधुतरोषणाई ही करण्यात आली होती.
गल्लोगल्ली घरोसमोर रंगीत रांगोळी घालण्यात आली होती.
सकाळपासुन गणेशमुर्तीचे स्वागत होत होते.गणेश मुर्तीच्या स्वागतासाठी अबालपासुन वृध्दापर्यत सर्वजन उत्साहाने गणेशमुर्तीच्या स्वागतासाठी सज्ज झाले.
मुर्तीकारांच्या घरापासुन फटाक्याच्या आताषबाजी करत गणेशमुर्तीचे घरोघरी सायंकाळ पर्यत अगमन होत होते.
#गर्लगुंजी मुर्तीकारांचे माहेर घर!
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावात गल्लोगल्ली गणेश मुर्तीकार आहेत.त्यामुळे गणेशमुर्ती नेण्यासाठी भाविकांची गर्दी गल्लोगल्ली दिसुन येत होती.