४६ जनानी केले रक्तदान!
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान. लायन्स अजित पाटील .
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे. रक्तदान केल्याने एकदाचा जीव वाचतो. त्यामुळे याहुन दुसरे मोठे कार्य नाही.म्हणून प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी रक्तदान करावे.ते केल्याने पुन्याचे काम होते.असे विचार खानापूर लायन्स क्लबचे लायन्स अजित पाटील (करंबळ) यानी सोमवारी दि ९ सप्टेबर रोजी सरकारी दवाखान्यात खानापूर लायन्स क्लबच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी बोलताना व्यक्त केले.
रक्तदान शिबीरात जवळपास ४६ जनानी रक्तदान केले. यावेळी लायन्स क्लबचे प्रसिडेंट सागर उप्पीन ,लायन्स अजित पाटील ,एम .जी कुमार, बी.एम.हम्मण्णावर,विकास कल्याणी,ज्यूनेद तोपिनकट्टी, डाॅ.प्रकाश बेतगावडा,मल्लाप्पा बेनकट्टी,चंबान्ना होसमनी,के एम घाडी आदी उपस्थित होते.
यावेळी बी एम हम्मणावर,यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.
तर तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. महेश किवडसन्नावर ,डाॅ नारायण वड्डिणावर यानी रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
आभार डाॅ. प्रकाश बेतगावडा यानी मानले.