
#आगीत लोखो रूपयाचे नुकसान!
#ता.पं.चे गाळे भाड्याने दिले होते !
#शेजारील गाळ्याना आगीचा धोका!
#अग्नीशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी.
खानापूर शहरातील पणजी बेळगाव महामार्गावरील सरकारी दवाखान्या समोरील जुन्या कोर्टातील तालुका पंचायतीने उभारलेल्या गाळ्यातील पुजारी बाॅन्डरायडर गाळ्याला गुरूवारी दि १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाॅर्टसर्कीट मुळे पुजारी बाॅन्डरटर गाळ्यातील झेराॅक्स मशीन,काॅप्यूटर,कपाटे व कागदपत्रकासह विविध साहित्य जळुन खाक झाली.
त्यात दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले.
त्याबरोबर शेजारी असलेले रोटरी अँड राम पारीश्वाडी यांच्या गाळ्याला आगीची झळ बसल्याने नुकसान झाले आहे.
सायंकाळीच्या वेळी आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. महामार्गावर असल्याने बघ्याची गर्दी वाढली.बघता बघता अगीने रूद्र आवतार धारण केला.
यावेळी अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. लागलीच अग्नीशामक दलाच्या जवानानी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार व डी सी सी बॅकेचे संचालक अरविंद पाटील व आमदार विठ्ठलराव हलगेकर अनेक नेत्यानी घटनास्थळी धाव घेतली.
अग्नीशामक दलाच्या जवानाचे शर्थीचे प्रयत्न!
पुजारी बाॅन्ड रायटर च्या गाळ्याला आग लागताच आगीने रूद्ररूप धारण केले.त्यामुळे वेळेत आग आटोक्यात आणली नसली तर शेजारी अनेक गाळे लागुन आहेत.त्याचे मोठे नुकसान झाले असते.
अग्नीशामक दलाच्या जवानानी आग वेळीच आटोक्यात आणली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. सदर घटनेची नोंद खानापूर पोलिसात करण्यात आली आहे.