
.
क.नंदगड शाळेत २४ वर्षे सेवा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
कसबा नंदगड (ता.खानापूर )येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक टी.आर.गुरव याना यंदाचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
खानापूर येथील शुभम गार्डन मध्ये आयोजित तालुका स्तरीय शिक्षक दिन कार्यक्रम आवरोळी मठाचे महास्वामी चन्नबसव देवरू याच्या सानिध्यात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रकाश गायकवाड,बीईओ कार्यालयाचे अधिकारी कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा व काॅलेज नोकर संघाचे प्रधान कार्यदर्शी सलिम कित्तूर ,प्राथमिक शाळा शिक्षक संघटनाचे तालुका अध्यक्ष आय बी सनदी,कार्यदर्शी पिराजी पाखरे सह संचालक ,विविध संघटनचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
टी आर गुरव यांचे जन्मगाव हेब्बाळ (ता .खानापूर )असुन सन १९९८ साली सागरे ( ता.खानापूर ) येथील प्राथमिक मराठी शाळेत नोकरीची सुरूवात केली .
त्यानंतर सन २००० मध्ये त्याची बदली कसबा नंदगड येथे झाली.तेथे त्यानी २४ वर्षे सेवा बजावली .
यंदाचा तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते शाल, प्रशस्ती पत्र, मानचिन्ह, व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आल्या .
यावेळी शाळा मुख्याध्यापक ,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.