#उभ्या भात पिकांचे तुटवुन नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा जंगलाने व्यापलेला तालुका म्हणुन ओळखला जातो.या तालुक्यात जंगली प्राण्याकडुन कधी माणसावर हल्ले तर कधी पिकांचे नुकसान हे प्रकार सातत्याने सुरूच आहेत. त्यामुळे जंगल भागातील नागरिक वैतागला आहे. मात्र वन खाते बिनदास्त आहे.उलट शेतकर्याना फटाके वाजुन हत्तीना त्रास देऊ नका
अशी कडक सुचाना दिली आहे.
अशाने गेल्या पंधरा दि व सा पासुन
गुंजी ( ता .खानापूर ) परिसरात हत्तीनी धुमाकुळ घात ला असुन उभ्या भात पिकांचे प्रचंड नुकसान करत आहे,.
गेल्या दोन दिवसा पूर्वी गुंजी येथील शेतकरी कृष्णा खेमाणी बिर्जे याच्या भिंबेगाळी शिवारातील रांग शिवारातील उभ्या भात पिकांचे तुटवुन प्रचंड नुकसान केले आहे.,
तसेच ज्ञानेश्वर कामतगेकर यांच्या मिठीतळे शिवारातील भात पिकांचे प्रचंड नुकसान केले.
घटनास्थळी नुकसान झालेल्या भात शिवाराचे अधिकार वर्गाने पाहणी करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
मात्र वनखाते, लोकप्रतिनिध या हत्तीचा बंदोबस्त कधी करणार याकडे शेतकरी वाट पाहात आहेत.

