
# सत्यनारायण महापूजा,महाप्रसादाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
लोंढा ( ता.खानापूर ) पंपगल्लीतील श्री नागनाथ देवस्थानचा वार्षिकोत्सव सोहळा सालाबाद प्रमाणे यंदा ही अम्मा भगवंताच्या कृपेने गुरूवारी दि.१९ रोजी सकाळी ८ वाजता अभिषेक व होम होऊन सत्यनारायण महापुजा होणार आहे.तर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७ वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी भाविकानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री नागनाथ देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.