
#मराठी शाळेच्यावतीने सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
भंडरगाळी ( ता. खानापूर ) गावची कन्या कु. स्वाती भाऊराव पाटील हिची भारतीय सैन्य दलात ( सी आय एस एफ ) निवड झाली.
केवळ देश सेवेची जिद्द स्वप्न उराशी बाळगुन भारतीय सैन्यात भरती झाली.तिचे प्राथमिक शिक्षण भंडरगाळीत तर हायस्कूलचे शिक्षण खानापूर येथे झाले .
उच्च शिक्षण घेऊन ती भारतीय सैन्यात भरती झाली. त्यामुळे भंडरगाळी गावात आनंद पसरला आहे.आई वडीलाना याचा सार्थ अभिमान वाटला.
कु.स्वाती भाऊराव पाटील हिची भारतीय सैन्यात ( सी आय एस एफ ) मध्ये निवड झाल्यानिमित्त भंडरगाळी (ता.खानापूर ) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस डी पाटील यानी प्रास्ताविक व स्वागत करून स्वाती पाटील हिचा परिचय करून दिला.
यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक एस डी.पाटील यानी पुष्पगुच्छ देऊन स्वाती पाटील हिचा सत्कार करून तिचे अभिनंदन केले. तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेचे शिक्षक ,विद्यार्थी व गावचे नागरीक ,पालक उपस्थित होते.