
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप गावचे जेष्ठ नागरीक व सीमा सत्याग्रही हभप घुराप्पा व्हळ्याप्पा तारीहाळकर ( वय.९८ )याचे शुक्रवारी दि.१३ रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
घुराप्पा व्हळयाप्पा तारीहळकर हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे कार्यकर्ते समर्थक होते. त्यांनी अनेक आंदोलनात मोर्चे भाग घेऊन सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेक वेळा आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी,पाच विवाहित मुलगे,एक विवाहित मुलगी,जावई, नातवंडे,पणतवंडे,असा परिवार आहे.