
#६० वर्षावरील जेष्ठ नागरीकासाठी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील सरकारी दवाखान्यात ६० वर्षावरील जेष्ठ नागरीकाना बीसीजी लसीकरण मोहिमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
प्रारंभी डाॅ.नारायण वड्डीन्नावर यांनी रोपांना पाणी वाढवुन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डाॅ.नारायण वड्डीमन्नी यानी स्वत: बीसीजी लसीकरण करून घेतला.
यावेळी डाॅ.नारायण वड्डीमन्नी म्हणाले की मी स्वता: मधुमेहाचा पेशंट असुन मी स्वत: लसीकरण करून घेतले आहे. तेव्हा क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने तो रोखण्यासाठी सरकारने गेल्या काही वर्षात अनेक उपययोजना केल्या आहेत.पण आता लस देऊन एक उत्कृष्ठ पाऊल उचलले आहे.त्यामुळे क्षयरोगाचे रूग्ण क्षयरोग असलेले लोक ,मधुमेह असलेले लोक ,कुपोषणाने ग्रस्त ,धुम्रपान करणारे, तसेच ६० वर्षावरील जेष्ठ नागरीकाना लसीकरण दिले जाते. अशी माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमास सरकारी दवान्यातील कर्मचारी व तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.