#पुढची तारीख लवकरच सांगण्यात येईल!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील जनतेच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निवारण व्हावे.या उद्देशाने कर्नाटक सरकारच्यानिर्देशानुसार
सप्टेंबर महिण्यातील प प्रजासेवा आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील चार ठिकाणी होणार्या बैठकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
सार्वजनिक अडचणी थेट प्रशासनाच्या निर्देशनास आणून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने दर प्रजासेवा आंदोलन करण्याच्या सुचना सरकारने दिल्या आहेत.
त्यामुळे खानापूर तालुक्यातील नागरीकाना आपल्या समस्या व तक्रारी मांडण्यांची संधी देण्यात आहे.
- परंतु उद्या बुधवारी दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता खानापूर लोकभवनात होणारा प्रजासेवा आंदोलनालाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे तहसील कार्यालयाकडुन सांगण्यात आले आहे.
- तरी खानापूर तालुक्यातील जनतेने यांची नोंद घ्यावी. असे आव२हन करण्यात आले आहे.
तरी पुढील तारीख लवकरच सांगण्यात येईल.
