#ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर लकेबैल गावावर शोककळा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लकेबैल (ता. खानापूर ) गावचे बाप लेक सोमवारी दि.७ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकी वरून बेळगावला जात असताना तोपिनकट्टी ते लोकोळी क्राॅस दरम्यान अज्ञात वाहनाची जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वार पुंडलिक अशोक नांदुरकर ( वय.२४) याचा जागीच मृत्यू झाला.तर वडील अशोक नांदुरकर ( वय.५८ ) हे गंभीर जखमी झाले. लागलीच त्याना उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
कामा निमित्त दोघे ही बेळगावला दुचाकीवरून जात होते.पुंडलिक हा उद्यबाग ये थे कामासाठी जात होता.तर वडील गंवडी काम करत होते.
गंभीर जखमी अशोक नंदुरकर याच्यावर बेळगाव येथील खासगी रूग्नालयात उपचार सुरू होते.मात्र उपचार दरम्यान
दुपारी दोन सुमारास मृत्यू झाला.
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर नांदुरकर कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, तर लकेबैल गावावर शोककळा पसरली आहे.
खानापूर पोलिसानी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.
पोलिसानी प्रयत्न करून लकेबैलच्या नांदुरकर कुटूंबाला न्याय द्यावा.व आरोपीला शिक्षा व्हावी.अशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे.
