
#खानापूर ता.पं.कार्यालयात ग्रंथालयाविषयी मार्गदर्शन शिबीर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार आहे.हे ग्रंथालय
जेष्ठ नागरीकाना पेपर वाचण्यासाठी ,काॅलेज विद्यार्थ्याना पुस्तकाचे ज्ञान व्हावे.शालेय विद्यार्थ्याना संगणकाचे ज्ञान व्हावे.तर सर्वाना ज्ञानाचे भांडार वाढावे. यासाठी सरकारने ग्राम पंचायतीच्या माध्यमातुन प्रत्येक ग्राम पंचायतीला ग्रंथालयाची सोय करण्यात आली आहे.
या ग्रंथालयात दैनिक पेपर वाचायला मिळतात.विविध प्रकारची पुस्तके मिळतात. विद्यार्थ्याना संगनकाचे ज्ञान मिळते.तेव्हा प्रत्येक नागरीकांनी या ग्रंथालयाचा सदुपयोग करावा.असे मार्गदर्शन तालुका पंचायतीच्या सरस्वती मुगदुम यानी शिबीराच्यावेळी केले.
येथील तालुका पंचायतीच्या कार्यालयात खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या ग्रंथालयाविषयी मार्गदर्शन शिबीर सोमवारी दि.९ पासुन प्रारंभ झाला.
मंगळवारी दि.१० रोजी तालुक्यातील गर्लगुंजी,कसबा नंदगड,भुरूनकी, बेकवाड आदी ग्राम पंचायतीच्या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल,चेअरमन ,सदस्य , प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक ,दोन हायस्कूलचे विद्यार्थी, दोन काॅलेजचे विद्यार्थी, दोन नागरीक ,दोन महिला अदीना मार्गदर्शन करण्यात आले.
या याशिबीराला गर्लगुंजी ग्रंथपाल संजय नारायण पाटील ,मुख्याध्यापिका सौ.एन.जी देसाई, बाळासाहेब पाटील ,संजय शंकर पाटील,हेमंत सुतार,श्रेया पाटील,सुचिता पाटील,राधिका कुंभार, तसेच कसबा नंदगड ग्राम पंचायतीचे सदस्य प्रविण पाटील तर बेकवाड,भुरूनकी आदी ग्राम पंचायत सदस्य व नागरीक उपस्थित होते.