
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील दुर्गानगरात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिराच्या इमारतीचा चौकट पुजन नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे कमिटीचे चेअरमन अमृत पाटील होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर पाटील नगरसेविका सौ मेघा कुंदरगी ,शिवानंद कुंदरगी,सोमनाथ गुरव,लक्ष्मण सेंगाळे,नगरसेविका सौ लता पाटील तसेच कमिटीचे पदाधिकारी व दुर्गानगरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सैनिक गणपत गावडे यानी केले. तर आभार दत्ता गुरव यांनी मानले.