
#डाॅ.डी.ई.नाडगौडा हे खानापूर डाॅक्टर असोसिएशन अध्यक्ष!
#समर्थ इंग्रजी हायस्कूलचे सचिव!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
मुळचे नागवे ( ता.चंदगड) गावचे सुपूत्र व खानापूर डाॅक्टर असोसिएशन अध्यक्ष डाॅ.डी.ई.नाडगौडा यांचा वाढदिवस शुक्रवारी दि.६ रोजी सादेपणाने केक कापून साजरा करण्यात आला.
#यानिमित्त त्याचा परिचय!
खानदानी व शेतकरी कुटूंबात जन्मलेले आई वडील पंढरीचे वारकरी,अल्पशिक्षित असले तरी मुलगा डाॅक्टर व्हावा.ही तळमळ असलेल्या आईवडीलानी कष्टाने डाॅक्टर केले.
डाॅ.डी.ई.नाडगौडा यानी डाॅक्टर पेशाची सुरूवात गर्लगुजी (ता.खानापूर) येथून केली. बरीच वर्षे सेवा करून त्यानी डाॅक्टरी सेवा खानापूर शहरातील जांबोटी क्राॅस येथे दवाखाना उभारून आज तागायत सेवा करत आहे.
गेली अनेक वर्षे खानापूर शहरासह तालुक्यातील गरीब जनतेची २४ तास सेवा देत अनेकाना पुर्नजन्म दिला. सर्प दंश ,वन्य प्राण्याच्या हल्ल्यातीलजखमीना,अडलेल्याना ,अपंग,
गरीब जनतेची आदराने सेवा करणारे डाॅक्टर म्हणजे डाॅ.डी.ई.नाडगौडा होय.
डाॅक्टरी सेवे बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समर्थ इंग्लिश मिडीयमची स्थापना करून गरीब विद्यार्थ्यानी इंग्रजी माध्यम शिक्षणाची सोय करून दिली.त्याचबरोबर श्री चौराशी देवी मल्टीपर्पज सोसायटी ही स्थापन करण्यात सिंहाचा वाटा आहे.
त्यांच्या कार्यामागे त्यांच्या पत्नी प्राचार्या सौ दिव्या नाडगौडा याची ही मोलाची साथ आहे.
त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याना खानापूर शहरासह तालुक्यातुन सामाजिक,राजकीय ,व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरानी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ.केल्या.
यावेळी वाढदिवसानिमित कुटूंबिय सौ दिव्या नाडगौडा,मुलगा,मुलगी ,तसेच नातेवाईक डाॅ. कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.