
#आशिर्वाद हाॅस्पिटलकडुन शासकीय व खाजगी योजना होणार लाभ!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा ३०० खेड्यांनी विस्तारलेला आहे.सर्वच खेड्यातील जनतेला मोठ्या हाॅस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेणे घरच्या परिस्थितीमुळे शक्य नाही.अशा खेड्यातील रुग्णाना सोयीचे व्हावे.या उद्देशाने आशीर्वाद हाॅस्पिटल,श्री आँर्थो आणि ट्राँमा सेंटर युनिट व खानापूर डाॅक्टर असोसिएशन यांच्यावतीने रविवारी खानापूरातील आशिर्वाद हाॅस्पिटलमध्ये मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले.
या शिबीरात विविध आजाराचे तज्ञ डाॅक्टरानी सेवा दिली. त्याचबरोबर या हाॅस्पिटलच्यावतीने रोग्याना यशस्वीनी आरोग विमा,धर्मस्थळ आरोग्य विमा,आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटक,बीपीएल एपीएल कार्डधारक तसेच हरिश योजनाचा लाभ मिळू शकतो.तेव्हा तालुक्यातील रूग्णानी या योजनाचा लाभ घेऊन आपले आरोग्य सुधरावे.असे आवाहन आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्थोपेडीक व स्पाईन सर्जन डाॅ.देवेगौडा आय होते.
व्यासपिठावर खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशन चेअरमन डाॅ.डी.ई.नाडगौडा ,माजी आमदार अरविंद पाटील,डाॅ.राघवेंद्र सागर, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.महेश किसन्नावर,भाजप नेते पंडित ओगले, राजेद्र रायका,नगरसेवक आपय्या कोडोळी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थितांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने व फोटो पुजनाने झाली .
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, डाॅ,महेश किडसन्नावर,डाॅ.देवेगौडा आय. आदीनी विचार व्यक्त केेले.
यावेळी तज्ञ डाॅक्टर डाॅ.नविन शेख,डाॅ. किरणकुमार पुजार,डाॅ.नझीर मुल्ला,डाॅ.सविता कडू,डाॅ.गिझरे,डाॅ.शेट्टी.डाॅ.लेकनाथ मदगण्णावर,व इतर डाॅक्टर उपस्थित होते.यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिबीराचा २८० रूग्णानी लाभ घेतला.
शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी डाॅक्टर असोसिएशनच्या पदाधिकार्यानी परिश्रम घेतले.