
#४ हाॅकी पट्टू मुलींची स्पोर्टस् हाॅस्टेलसाठी निवड!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात इतकी वर्षे हाॅकी खेळाचा गंधही नव्हंता. त्याच तालुक्यातील चार हाॅकी खेळाची सुरूवात होऊन चक्क ताराराणी हायस्कूलच्या ४ हाॅकी पट्टू मुलींची म्हैसुर येथील युथ स्पोर्टस् हाॅस्टेल साठी निवड झाली. त्यामुळे खानापूरच्या ४ हाॅकी पट्टू मुलीनी खानापूरचा लौकीकात मानाचा तुरा रोवला.
त्यानिमित्त ताराराणी हायस्कूलमध्ये ४ हाॅकी खेळांडुचा सत्कार करण्यात आला.
हाॅकी खेळात राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनींची म्हैसूर येथील युथ स्पोर्ट्स हाॅस्टेलसाठी येथील एक नाही दोन नाही तर तब्बल चार विद्यार्थिनींची निवड झाली असून या विद्यार्थिनीं कु. मयुरी प्रमोद कंग्राळकर, साक्षी संदीप पाटील, साक्षी संभाजी चौगुले आणि आयेशा शौकतअली शेख यांचा शाळेतर्फे सत्कार व निरोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मराठा मंडळ संस्धेचे संचालक शिवाजीराव पाटील, मुख्याध्यापक राहुल एन. जाधव, क्रीडा शिक्षिका श्रीमती अश्विनी पाटील याच्याहस्ते निवड झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. हाॅकी खेळांडुचे मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डाॅ.राजश्री नागराजू यानी अभिनंदन केेले. कार्यक्रमास हाॅकी कोच निवृत सैनिक गणपत गावडे, पालक व शिक्षक उपस्थित होते.