#खानापूर तालुका संत गोरा कुंभार समाज विकास मंडळतर्फे!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
बेळगाव व खानापूर तालुक्यातील कुंभार समाजातील यंदाच्या सातवी, दहावी, बारावी व पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.
खानापूर तालुका संत गोरा कुंभार समाज विकास मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे .
तरी बेळगाव शहर,बेळगाव तालुका व खानापूर तालुक्यातील यंदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता व व्हाटसअप नंबरसह
खानापूर तालुका संत गोरा कुंभार समाज विकास मंडळांच्या सदस्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी मंडळाचे सचिव परशराम पालकर, ( 8123816749) यांच्याशी संपर्क साधावा.,असे आवाहन अध्यक्ष भैरू कुंभार यांनी केले आहे.