
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहराची ग्रामदेवता श्री चौराशीदेवी मंदिरात शुक्रवारी दि.३० रोजी सकाळी ९ वाजता ग्रामदेवता चौराशी देवी मुर्ती प्रतिष्ठापणा दिन सोहळा साजरा होत आहे.
यानिमित्त सकाळी श्रीचौराशी देवीच्या मुर्तीला अभिषेक,व धार्मिक विधी होऊन दुपारी १२ ते ३ वाजेपर्यत महाप्रसाद होणार आहे. या महाप्रसादाला श्री चौराशी देवीच्या भक्तानी सहकुटूंब सह परिवाव मोठ्यासंख्येने उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री चौराशी देवस्थान कमिटी,व खानापूर ग्रामस्थानी केले आहे.
त्याचबरोबर वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी रात्री ९ ते १२ पर्यत सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादासाठी ज्याना धान्य स्वरूपात ,वस्तू स्वरूपात अथवा रोख रक्कम देऊन मदत करायची असेल तर त्यानी श्री चौराशीदेवस्थान कमिटीशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.