
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#३० एप्रिल पासुन प्रारंभ!
#२८ मे रोजी सांगता समारंभ!
,संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
श्रीमंत ब्रह्म चैतन्य जगदगुरू श्री तुकाराम महाराज यांचे विद्या वंशज सदगुरू हभप तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज पंढरपूर श्री गुरू हभप नामदेव (नानासाहेब) तात्यासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशिर्वादाने व गुरूर्व प्रभूराज नामदेव वासकर महाराज पंढरपूर यांच्या अज्ञेने नुकताच खानापूर तालुक्यातील बालकाना शाळाना सुट्टी मिळताच खानापूर तालुका वासकर सांप्रादाय मंडळाच्या वतीने बालकाना बाल संस्कार शिबीराचे आयोजन खानापूर शहरातील पारीश्वाड रोडवरील लक्ष्मीनगर क्राॅस येथे करण्यात आले.
३० एप्रिल पासुन बाल संस्कार शिबीरालाप्रारंभ झाला असुन या बालसंस्कार शिबीरात खानापूर शहरसह असोगा,मणतुर्गा,रूमेवाडी,
मोदेकोप, बिदरभावी,सन्नहोसुर, लोकोळी,मुगवडा,मडवाळ,तेरेगाळी,करंबळ मळव आदी गावच्या बालकांचा समावेश आहे.
या बाल संस्कार शिबीरात बालकाना टाळ, मृदंग,अभंग,ज्ञानेश्वरी अध्याय व इतर भक्तीचे ज्ञान दिले जात आहे.
सोमवारी निलावडेचे हभप विठोबा सावंत ,ग्राम पंचायतीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर,हभप यल्लापा वाकोडे,हभप विठ्ठल हलगेकर(करंबळ),
हभप सुभाष घाडी,हभप (चोपदार) म्हात्रू कुसाळे, हभप मारूती मजगावंकर यानी उपस्थिती दर्शविली.
यावेळी बालकानी पसायदान,अभंग,टाळ मृदंग पकवाज,आदीचे ज्ञान घेतल्याचे दाखवुन दिले.
दि.२८ रोजी सांगता समारंभ!
बाल संस्कार शिबीराचा सांगता समारंभ दि.२८ मे रोजी होणार आहे. यापुढे ही १ जुन पासुन प्रत्येक शनिवारी दुपारी २ ते रविवारी सायंकाळी ६ पर्यत बाल संस्कार शिबीर चालु राहणार आहे. तरी तालुक्यातील बालकानी याचा लाभ घ्यावा .असे आवाहन हभप विठोबा सावंत यानी केले आहे.