
#इटगी गावातील भाजपाचे दिग्ग्ज पडले तोंडघशी !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
इटगी (ता.खानापूर ) ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत युथ कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यानी किल्ला लढविला. आणि पोटनिवडणुक जिंकली.
या पोटनिवडणूकीचा निकाल लागला आणि युथ कॉंग्रेसचे मंजूनाथ भिमाप्पा कुल्लोळी हे ७१ मतांनी विजयी झाले. मंजूनाथ यांना २८४ व विरोधी उमेदवारांस २१३ एवढी मते पडली.
विजयाची माळ पडताच इटगी येथे जाऊन ताईंच्या सुचनेनुसार सुरेश जाधव यांनी विजयी उमेदवारांचे हार व शाल घालून सत्कार केला व त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी खानापूर नगरसेवक तोहीद, युथ अध्यक्ष रायाप्पा बळगप्पनवर, पंचायत सदस्य देणाऱ्या गंगनायक, विरेश केरी, चेतन शिखरमट्टी, अशोक बळगप्पनवर, बाबू नायकर, सुरेश बळगप्पनावर, मंजू बळगप्पनावर, रियाझ नदाफ, आप्पाना दोडमनी, इब्राहीम नदाफ, पुनीत बळगप्पनावर, रत्नाकर टकाईत आदी उपस्थित होते.
यावेळी खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस तर्फे नवनिर्वीचित विजयी उमेदवाराचे अभिनंदन करण्यात आले.
🚩जय खानापूर 🚩