
#अखिल भारतीय प्रजापती महासंघातर्फे पुरस्कार प्रदान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावचे सुपूत्र खानापूर तालुका संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष सोमनाथ धनाजी कुंभार याना अखिल भारतीय प्रजापती महासंघातर्फे देण्यात येणार प्रजापती माती कला विकास भूषण पुरस्कार रविवारी दि. २५ मे रोजी पुणे येथील कार्यक्रमात देऊन सन्मानित करण्यात आले.
गर्लगुंजीचे सुपूत्र सोमनाथ कुंभार सध्या खानापूर येथील सीव्हीपीआय( cvpi )येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून समाजात मातकाम करणारे कलाकार म्हणून त्यानी ख्याती निर्माण केली आहे.
इतरांना कला दिल्याने कलेचा विकास होतो. एका पेक्षा जास्त कलाकार समाजात तयार होतात आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून व्यवसाय करू शकतात हा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
सोमनाथ कुंभार याना प्रजापती माती कला विकास भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल गर्लगुंजी परीसरातून तसेच खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.