
#खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.डी.ई.नाडगौडांच्याहस्ते उदघाटन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक, बाजार पेठेत डॉ. जगदीश आदिनाथ बुवाजी यांच्या “आदिशंकर क्लिनिक”चे उद्घाटन , खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.डी. ई. नाडगौडा यांच्या हस्ते फित कापून मोठ्या उत्साहात करण्यात आले.
प्रारंभी डाॅ.जगदिश आदिनाथ बुवाजी यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
आदिशंकर क्लिनीक च्या उदघाटन कार्यक्रमाला डॉ. सागर चिट्टी, डॉ. सागर नार्वेकर, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. किरण लाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना खानापूर तालुका डाॅक्टर असोसीएशनचे अध्यक्ष डाॅ.डी.ई.नाडगौडा म्हणाले की वैद्यकिय सेवा करताना रूग्णाशी आपूलकीने बोलुन त्यांना धीर देऊन त्याचा आजार कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करने हेच डाॅक्टरांचे कर्तव्य आहे. रूग्ण बरा व्हायचा असेल तर डाॅक्टरानी त्याच्या मनातली भिती दुर करणे गरजेचे आहे.
म्हणूनच समाज डाॅक्टराना देव मानतात.
असे मत व्यक्त केले.
यावेळी डाॅ. जगदिश बुवाजी यानी आभार मानले.