
#भीमगड अरण्याचे वन अधिकारी श्री नदाफ यानी दिली माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर तालुक्यातील भीमगड अरण्याची माहिती खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्याना शनिवारी दि.३१ मे रोजी भीमगड अरण्याचे वनअधिकारी श्री नदाफ यांच्या मार्गदर्शणाखाली मिळाली.
शनिवारी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल चे पहिली ते दहावी पर्यतचे विद्यार्थ्यानी भीमगड अरण्यात जाऊन जंगल म्हणजे काय असते ? याची माहिती,तेथील विविध जातीची झाडे व वन्यप्राण्याची माहिती करून घेतली.
यावेळी ई एल डी मार्फत विद्यार्थ्याना वाईल्ड लाईफ,त्याची घ्यावयाची काळजी,भीमगड अरण्य रिजर्व्ह फाॅरेस्ट म्हणून ओळखले जाते.विशेष महत्व आहे.वेगवेगळ्या जातीचे पक्षी,प्राणी,औषधी वनसपती आदीची माहिती दिली. त्याचे संगोपन कसे केले जाते.याची सविस्तर माहिती देण्यात आली.
भीमगड अरण्याला भेट देण्याचे भाग्य समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्याना मिळाल्याना विद्यार्थ्यातुन समाधान पसरले होते.
यावेळी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या सौ दीव्या डी.नाडगौडा यानी वनखात्याचे मनपूर्वक आभार मानले.
तसेच संस्थेच सचिव डाॅ.डी.ई.नाडगौडा यानी ही वन अधिकारी श्री नदाफ सर्व स्टाॅपला धन्यवाद दिले.