
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे सरकारी प्रथम दर्जा महिला काॅलेजतर्फे नुकताच करण्यात आले .
या रोजगार मेळव्यासाठी जवळपास १०७० उमेदवारानी आँनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी ९०० उमेदवारानी हजेरी लावली होती. मुलाखती घेऊन ७१७ उमेदवाराना नोकरीची संधी अनेक नामांकित औधोगिक कंपन्यामधुन मिळाली.यामध्ये टाटा इलेक्ट्राॅनिक्स ,फाॅक्सकाॅन ,व्हिस्ट्रान ,याच्यासह बेळगाव मधील स्थानिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
ही संधी १० वी १२ वी,आयटीआय, पदवी ,पदव्यूत्तर विद्यार्थ्याना रोजगार मेळाव्यातुन उपलब्ध झाली.
यावेळी रोजगार मेळाव्याचे उदघाटन प्लेसमेंट विभागाचे समन्वय डाॅ.शमसुद्दीन नदाफ याच्याहस्ते झाले .यावेळी डाॅ.एन.आर. पाटील ,डाॅ.रमेश मांगलेकर,डाॅ.विजयालक्ष्मी नायक, प्रकाश मबनूर आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.