
#अस्वलच्या हल्ल्यात डावा पाय निकामी!
#कृतीम पाय बसविण्याची जबाबदारी घेतली!आर्थिक ही मदत केली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तसेच खानापूर तालुका वकील संघटनेचे तालुकाध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी माजी आमदार व एआयसीसीच्या सेक्रेटरी
अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या आदेशानुसार मान ( ता.खानापूर) येथील शेतकऱी सखाराम गावकर याच्या डाव्या पायाला अस्वलाने हल्ला केल्यामुळे पाय निकामी झाला .
गेल्या पंधरा दिवसापासून अगदी मृत्यूच्या दाडेत असलेले रुग्ण सखाराम गावकर यांची खानापूर काॅग्रेस तालुका अध्यक्ष अँड ईश्वर घाडी भेट घेऊन त्यांना दोन वेळा विचारपूस करून आर्थिक मदत केली.ऐवढेच नव्हे तर कृत्रिम पाय बसवुन देण्याची जबाबदारी घेतो.असे सांगून त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले. तसेच वनखात्याकडून सरकारी नियमानुसार काय करता येईल ते माजी आमदार व एआयसीसी सेक्रेटरी डाॅ.अंजली निंबाळकर यांच्यामार्फत आपण प्रयत्न करतो व जास्तीत जास्त मदत सरकारी मिळवून देतो असे सांगून त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांची पत्नी व मुलगा जनार्दन गावकर उपस्थित होता. तसेच त्यांच्यासोबत खानापूर तालुका व ग्रामपंचायत संघटनेचे युनियन अध्यक्ष विनायक मुतगेकर ही उपस्थित होते