#खानापूर सरकारी पी. यू.काॅलेजात करिअर मार्गदर्शन शिबीर !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
विद्यार्थी दशेत किशोरवयीन मुलाना काय चांगले आणि काय वाईट याची जाणीव असली पाहिजे, त्यानी प्रेम, मौजमजा तसेच इतर गोष्टीकडे आपले मन भरकटू न देता आपले भविष्य घडविण्यावर लक्ष केंद्रीत करावे.असे मार्गदर्शन बाल विकास अकादमीचे सहसंचालक विरूपाक्ष पाटील यानी मंगळवारी दि.३ रोजी खानापूर सरकारी पी, यू, काॅलजात आयोजित महिला व बाल विकास व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने कार्यक्रमात बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविकास अकादमीचे अध्यक्ष अडिवेश इटगी होते.
कार्यक्रमाची सुरूवात पाहुण्याच्याहस्ते रोपाला पाणी घालुन करण्यात आले.
व्यासपिठावर पी, यू, काॅलेजचे प्राचार्य डाँ.सी.बी.ताबोजी, पी.यू.काँलेज विकास समितीचे व पत्रकार प्रसन्ना कुलकर्णी, प्रा, श्रीधर चिंचणी, प्रा.एस. डी.तळवार,पी एम श्री स्कूलचे मुख्याध्यापक एस एन ककम्मार,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन बाल विकास अकादमीचे अध्यक्ष अडिवेश इटगी यांचा शाल, म्हैसुर फेटा, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना बाल विकास अकादमीचे अध्यक्ष अडवेश इटगी म्हणाले की, खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रतिभावंत लोकानी आज विविध क्षेत्रात यश मिळविले आहे.।यामध्ये खानापूर तालुक्याच्या कन्या माजी मंत्री , आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यानी मंत्रीपद मिळविले, यांचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यानी घेऊन ध्येय गाठावे. असे आवाहन केले.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत श्र्वेता पट्टा यानी केले.तर आभार संदीप देशमुख यानी मानले.